ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औद्योगिक विभाग तालुका काँग्रेस उपाध्यक्षपदी नागेश ईटेकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविणारे तसेच सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नागेश ईटेकर यांची औद्योगिक विभाग तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती होताच काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर वडेट्टीवार यांच्या हस्ते नागेश ईटेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. औद्योगिक विभाग काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कमलेश निमगडे आणि तालुकाध्यक्ष दर्शना दुर्गे यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या नागेश ईटेकर यांनी सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत सर्वसामान्य नागरिक, युवक आणि कामगारांच्या प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ईटेकर यांनी सांगितले.

त्यांच्या नियुक्तीबद्दल रामदास मोहूर्ले, दिलीप वासेकर, महेंद्र कुणघाडकर, माधव लडके, विनय मोहूर्ले, योगेश कोरवते, अतुल झाडे, अमित भसारकर, विनोद धोडरे, राजेश डोंगरे, हर्ष महेशकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये