ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स वर्धा तर्फे ” अंमली पदार्थ विरोधी जनजागृती” मोहिम

शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच सर्व सामान्य नागरीकांना अंमली पदार्थापासुन दुर राहण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आजचा तरुण हा उद्याच्या भारताचा पाठीचा कणा आहे. आपल्या देशात जगात सर्वांत जास्त तरुण लोकसंख्या आहे. म्हणूनच भारताचे भविष्य या पिढीच्या हातामध्ये आहे. परंतु, दुर्दैवाने आजची आपली ही तरुण पिढी एका उघडया डोळ्यांनी दिसणाऱ्या राक्षसाच्या जवडयात अडकत चालली आहे, आणि त्या राक्षसाचे नाव आहे” व्यसन”. काही तरुण ताणतणाव, नैराश्य किंवा अपयशापासून पळ काढण्यासाठी अंमली पदार्थाचे सेवन करतात पण ही गम्मत कधी आयुष्य उध्वस्त करणारे व्यसन बनते हे कोणालाच कळत नाही. अंमली पदार्थाचे सेवन हे आनंदाचे साधन नसून, विनाशाचे आमंत्रण आहे. अंमली पदार्थाचे सेवनामुळे शारीरिक आणि मानसिक हानी होते शरीर आतून पोकळ होते. कर्करोग (Cancer), यकृत (Liver) खराव होणे, हृदयविकार आणि मानसिक संतुलन बिघडणे यांसारखे गंभीर आजार होतात. अंमली पदार्थाचे सेवनाने आरोग्यावर, कुटुंबावर आणि समाजावर विपरीत परिणाम होत असुन अंमली पदार्थाचे सेवन केवळ व्यक्तीचे शारीरिक व मानसिक स्वास्थ विघडवत नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीला देखील चालना देते.

“Drugs Free Wardha”, संकल्पनेवर आधारित सुरक्षित भविष्याची दिशा आणि नशामुक्त समाज घडविण्याकरीता आज दिनांक २६/०९/२०२६ रोजी अॅन्टी नार्कोटीक टास्क फोर्स वर्धा तर्फे बस स्टैंड वर्धा येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिम राबविण्यात आली. अंमली पदार्थाचे सेवन वावत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला एकत्रित करून मार्गदर्शन करण्यात आले.

सदर ठिकाणी मोठया संख्येने विद्यार्थी तसेच वस स्थानक, वर्धा येथे हजर असलेले सर्व सामान्य नागरिक हजर होते. सदर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमे दरम्यान विद्यार्थी यांना तसेच सामान्य नागरिकांना अमली पदार्थ संबंधाने माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. त्याच प्रमाणे तिथे उपस्थित नागरिकांना अंमली पदार्थ तसेच अवैध व्यवसाय वावत कोणत्याही प्रकारची माहिती असल्यास सदरची माहिती पोलीसांना देणे बाबत आवाहन करण्यात आले.

सदर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती (Drugs Free Wardha) मोहिम श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सदाशीव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये