Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

फेरफार करण्यासाठी लाच घेताना तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला अटक

15000/- रुपयांची केली होती मागणी

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

फेरफार करण्यासाठी 15000/- रू लाच मागण्याच्या प्रकरणात गडचिरोली येथे वास्तव्यास असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने चिमूर येथे केलेल्या कारवाईत राजु विठ्ठलराव रग्गड, तलाठी कार्यालय म्हसली, साजा क्र. २९, (अतिरिक्त कार्यभार अडेगाव देशमुख, पळसगाव) व सुनिल महादेवराव चौधरी, मंडळ अधिकारी, सर्कल गोंदडा तहसिल कार्यालय चिमुर, ता. चिमुर जि. चंद्रपुर यांना लाचेच्या सापळयात रंगेहात अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार हे जिल्हा परिषद गडचिरोली येथुन जुन २०२२ मधे सेवानिवृत्त झालेले असुन ते गडचिरोली येथे स्थायिक आहेत. तक्रारदार व त्यांचे भावांचे नावानी मौजा अडेगाव (देशमुख) ता. चिमुर जि.चंद्रपुर येथे गट क्र २७३ मध्ये २.८४ हे.आर.चौ.मी. शेतजमीन असून तक्रारदार यांची आत्याचे सुध्दा नाव आहे. तक्रारदाराच्या आत्याने सदर शेतीतून स्थावर मिळकतीवरील आपल्या ‘हक्कसोडपत्र’ (विनामोबदला) बाबत दुय्यम निबंधक श्रेणी-1, चिमुर या कार्यालयातून रीतसर नोंदणी करून घेतली. सदर शेतजमिनीवर तक्रारदार व त्यांचे भावाचे नाव कायम ठेऊन आत्याचे नाव कमी करून फेरफार करून देण्याचा कामाकरीता तक्रारदार यांना आरोपी तकाठी राजु विठ्ठलराव रागड, तलाठी कार्यालय म्हसली, साजा क्र. २९ (अतिरिक्त कार्यभार अडेगाव देशमुख, पळसगाव) तहसिल कार्यालय चिमुर यांनी १५,००० /- रू ची लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय चंद्रपुर येथे लेखी तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०८/०८/२०२३ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी राजु विठ्ठलराव रग्गड, यांनी १५,०००/- रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती ११,०००/- रूपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून दिनांक ०८/०८/२०२३ रोजी तलाठी कार्यालय चिमुर येथील लेक्चरर कॉलनी, पाचभाई यांचे घरी किरायाने असलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी पंचासमक्ष सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी याने तडजोडीअंती ११,०००/- रु. लाच रक्कम स्वहस्ते स्वीकारल्याने त्याल पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच सुनिल महादेवराव चौधरी, मंडळ अधिकारी, सर्कल गोंदेडा तहसिल कार्यालय चिमुर त्यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याकरिता अपप्रेरणा दिली. त्यावरून दोन्ही आरोपातांना ताब्यात घेण्यात आलेले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक मंजुषा भोसले ला. प्र. वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक, तसेच कार्यालयीन स्टॉफ ना.पो.अ. संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, पो. अं वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, मपोका पुष्पा काचोळे व चालक पो अ सतीश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली.

चंद्रपुर जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, त्यांच्याकडे कोणत्याही शासकिय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकिय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्का व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा असे आवाहन राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, ह्यांनी केले आहे. तसेच खालील क्रमांकावर देखिल तक्रार नोंदविताना येऊ शकते असेही स्पष्ट केले आहे.

श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, कार्यालय नागपुर, फोन ०७१२-२५६१५२०

मंजुषा भोसले, पोलीस उप अधीक्षक, ९३२२२५३३७२, अँटी करप्शन ब्युरो, कार्यालय चंद्रपुर फोन क्र. ०७१७२-२५०२५१ टोल फ्री नंबर १०६४

श्री प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक ९९३०५५६१६१

श्री. जितेंद्र गुरनले, पोलीस निरीक्षक ८८८८८५७१८४ Website www.acbmaharashtra.gov.in

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये