सावंगी मेघे पोलीसांची जुगार खोळणाऱ्यांवर धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील गुन्हे शोध पथक पो.स्टे. परीसरात अवैध धंद्यावर कारवाई करीता पेट्रोलींग करीत असता मौजा गिट्टीखदान बोरगाव मेघे टेकडीवर विजय वासनीक याचे राहते घरी काही ईसम 52 ताश पत्यावर पैशाचा डाव लावून हार जितचा जूगार खेळ खेळत आहे. अशा माहितीवरून त्यांचेवर दि. 07.09.2026 चे 22:00 वा ते 23:00 वा. दरम्यान जुगार रेड केला असता मोक्क्यावर 1) विजय रामभाउ वासनीक वय 38 वर्ष, रा. गिट्टीखदान बोरगाव मेघे, ता.जि. वर्धा 2) 2) गणेश इश्वरराव निकोडे वय 37 वर्ष रा. गणेशनगर बोरगाव मेघे 3) दिपेश राजकुमार सेवलानी वय 24 वर्ष, रा. दद्यालनगर, वर्धा 4) नितेश धरमदास वनकर वय 36 वर्ष, सिध्दार्थ नगर, वर्धा 5) अक्षय मच्छिंद्र मेश्राम वय 31 वर्ष, रा. सिध्दार्थ नगर, वर्धा 6) आदित्य शंकरराव वासनीक वय 25 वर्ष रा. गिट्टीखदान जि. वर्धा. 7) जुबेर खान अयुब खान वय 27 वर्ष रा. डॉक्टर जाकीर हुसेन कॉलनी बोरगाव मेघे वर्धा 8) नरेश राजु हडोळे वय 28 वर्ष रा. सिध्दार्थ नगर बोरगाव मेघे वर्धा 9) नदिम जमीर सयद वय 37 वर्ष रा. गिट्टीखदान बोरगाव मेघे वर्धा 10) रितेश नागराज सुखदेवे वय 36 वर्ष रा. पाण्याचे टाकीजवह, बोरगाव मेघे वर्धा 11) संजय महेश आयलानी वय 28 वर्ष रा. दद्यालनगर वर्धा 12) विशाल प्रमोदराव मुन वय 35 वर्ष रा. सिध्दार्थ नगर बोरगाव मेघे वर्धा 13) सलमान युनुस खान पठाण वय 33 वर्ष रा. सिध्दार्थ नगर बोरगाव मेघे वर्धा 14) पंकज शंकरराव कैथवास वय 34 वर्ष रा. सिध्दार्थनगर, बोरगाव मेघे वर्धा ईसम जुगार खेळ खेळताना मिळून आले, त्यांचे ताब्यातून व डावावरून 1) एकुण नगदी 21,540/रू, 2) एकुण मोबाईल किं. 1,37,500/रू. 3) 52 ताश पत्ते किं. 50/रु. असा एकुण जु.कि. 1,59,090/रु. चा मुद्देमाल जप्त करून पो.स्टे.ला अप.क. 711/2026 कलम 4, 5 म.जु.का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल महाडीक साहेब, यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री विनोद गिरी सा, ठाणेदार, पो.स्टे. सांवगी, पो.उप.नि. मनोज टिपले, पोउपनि गोपाल शिंदे, पोउपनि सामलवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, सचिन घेवंदे, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव यांनी केली असून पुढील तपास संजय पंचभाई, हे करीत आहेत.



