आगामी सण-उत्सव अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता व समन्वय बैठक संपन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक ३१.०८.२०२६ रोजी १६.०० वा वर्धा जिल्हयात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा दिनांक ०४.०९.२०२६ रोजी गोकुळाष्टमी, दिनांक ०५.०९.२०२६ रोजी गोपाळकाला, दिनांक १०.०९.२०२६ रोजी पोळा, दिनांक ११.०९.२०२६ रोजी तान्हा पोळा व दिनांक १४.०९.२०२६ ते दिनांक २५.०९.२०२६ पावेतो गणेशोत्सव मोठया उत्साहाने सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक ३१.०८.२०२६ रोजी १६.३० वा. मा. मा. जिल्हाधिकारी वर्धा यांचे अध्यक्षतेत जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकी करीता मा. वान्मथी सी., जिल्हाधिकारी वर्धा, मा. सौरभ कुमार अग्रवाल, मा. सुरज गोहाड, अतिरीक्त मुख्याधिकारी, जि.प. वर्धा, मा. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्रीमती शोभिका पाठक, सहायक जिल्हाधिकारी वर्धा व महसुल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, म.रा.वि.वि.क.लि., उपप्रादेशिक परिवहन, आरोग्य विभाग, अग्निशमन दल व परिवहन विभाग तसेच जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य, गोकुळाष्टमी, पोळा, गणेश मंडळाचे आयोजक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार हे उपस्थीत होते. बैठकीचे प्रास्ताविक मा. श्री. प्रताप वाघमारे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी वर्धा यांनी केले.
मा. जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सर्व धर्मीय बांधवांनी परस्पर समन्वय, सहकार्य व सौहार्द राखून सण शांततेत व आनंदात साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले. स्थापना व विसर्जन मिरवणुक व इतर धार्मिक सांस्कृतीक कार्यक्रमादरम्यान वाहतूक नियमांचे पालन करणे, ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांचे काटेकोर पालन करावे व लेझर लाईट न वापरण्याबाबत तसेच अफवा व गैरसमज टाळण्याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी गणपती सण दरम्यान समाजासमाज मध्ये सौहार्द राखण्याचे आवाहन केले, ध्वनी प्रदुषण होणार नाही तसेच लेझर लाईटचा वापर न करणेबाबत सुचना दिल्या, सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट न करणेबाबत, कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. वर्धा जिल्हा पोलीस दलाकडुन यावर्षी उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा आयोजीत करण्यात आली असुन स्पर्धेची संकल्पना “उत्सव भक्तीचा सहभाग समाजाचा संकल्प सुरक्षित वर्ध्याचा” अशी असल्याची सांगीतले. सदर स्पर्धा १. सायबर सुरक्षित गणेशोत्सव, २. अंमली पदार्थ विरोधी अभियान, ३. महिला व बालसुरक्षा, ४. वाहतूक सुरक्षा, ५. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, ६. आरोग्य तपासणी शिबिर, ८. कायदा व सुव्यवस्था व शिस्त या विषयावर आधारीत असुन पोलीस स्टेशन स्तरावर उत्कृष्ट ०३ सार्वजनिक गणेश मंडळ व पोलीस अधीक्षक स्तरावर ०३ उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच महिला व मुलींची छेडखानी करणाऱ्या/रोडरोमियोच्या प्रतिबंधाकरिता, शाळा, कॉलेज, ट्युशन, बसस्थानक, रेल्वेस्टेशन किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी असुरक्षितता जाणवत असल्यास, संकटप्रसंगी महिला, मुलींना व जेष्ठ नागरिकांना तात्काळ मदतीकरिता २४x७दामिनी पथक मोबाईल व्हॉट्सअॅप क्रमांक ७६२०५२००२५ हा मा. जिल्हाधिकारी वर्धा, मा. पोलीस अधीक्षक, वर्धा व इतर मान्यवर यांचे उपस्थितीत जारी करण्यात आला व उपस्थितांना याबाबत मा. पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन केले व या क्रमांकाचा प्रसार करण्याचे आवाहन केले.
मा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक वर्धा यांनी उपस्थितांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
सदर बैठकीचे आभार प्रदर्शन मा. श्री. सुनिल महाडीक, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा यांनी केले व बैठकीची सांगता झाली.



