Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

अमृत भारत स्टेशन योजनेच्या रुपाने वर्धा लोकसभेसाठी केंद्र सरकारची अनोखी अशी सुवर्ण भेट:खासदार रामदास तडस

पुलगांव, सेवाग्राम, हिंगणघाट व धामणगांव रेल्वे स्थानक येथे उत्साहात भूमिपूजन समारंभ संपन्न

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

अविनाश नागदेवे, वर्धा

आज देशाचे लोकप्रीय व यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी कार्यक्रम आभासी पध्दतीेने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), केंद्रीय रेल्वे, मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश, रेल्वे बोर्डचे अध्यक्ष श्री अनिल कुमार लाहोटी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

वर्धा जिल्हा राष्ट्रपीता महात्मा गांधी व विनाबा भावे यांची पावन भुमी व ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे, वर्धा लोकसभा क्षेत्रात सर्वात जास्त रेल्वे स्थानके असुन याती 4 रेल्वेस्थानकाचा एकाच वेळी पायाभरनी कार्यक्रम आज पुलगाव येथे संपन्न झाला,यावेळी रेल्वे चे विभागीय व्यवस्थापक नितीन पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, राजेश बकाने, एसडीपीओ संजय पवार, लेफ्टीनंट कर्नल प्रशांत शर्मा, मिलिंद भेंडे ,संजय गाते, नितीन बडगे उपस्थित होते.

रेल्वेस्थानकाचा विकास म्हणजे वर्धा लोकसभा क्षेत्रासाठी वरदान ठरेल, अमृत भारत स्टेशन योजनेच्या रुपाने वर्धा लोकसभेसाठी केंद्र सरकारची अनोखी अशी सुवर्ण भेट असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये