Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

सुराजागड प्रकल्पाने घेतला तिघांचा बळी – भिषण अपघातात अभियंता ठार

हरियाणा राज्यातील दोन कामगारही पडले मृत्यूमुखी

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरत असलेल्या सुराजागड लोह खनिज प्रकल्पात झालेल्या भिषण अपघातात युवा अभ्यांत्यासह दोन परप्रांतीय कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या सुरजागड प्रकल्पात नेहमीप्रमाणे खनिज उत्खनन सुरू होते. 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:00 वाजताच्या सुमारास उत्खनन सुरू असलेल्या टेकडीवरून अवजड वाहन खाली कोसळले. दुर्दैवाने खाली उभ्या असलेल्या जीप वर वाहन पडल्याने अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथिल 26 वर्षीय युवा अभियंता सोनल रामगिरवार व हरियाणा राज्यातून कामासाठी आलेले इतर दोन कामगार मृत्यूमुखी पडले, त्यांची ओळख रात्रीपर्यंत पटली नव्हती.

अपघात घडताच कार्यरत इतर कामगार व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांचाही मृत्यु झाल्याच्या घटनेवर शिक्कामोर्तब केले. ह्या अपघातात मृत्यूमुखी पडलेला युवा अभियंता सोनल रामगिरवारचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला आहे. स्थानिक युवा अभियंता अपघातात मृत्युमुखी पडल्याने अहेरी सह परिसरात आक्रोश व रोष असे संमिश्र वातावरण निर्माण झाले असुन जनतेच्या उद्रेकामुळे परिस्थिती चिघळू नये ह्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये