ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोजोली मक्ता तंटामुक्त अध्यक्षपदी मंगेश पेंदोर बिनविरोध _ प्रशासक विशाल यादव ग्रामसभाध्यक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गावातील सलोखा, शांतता आणि सामाजिक ऐक्य मजबूत करण्याची जबाबदारी

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली मक्ता येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मंगेश पेंदोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रशासक विशाल यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत गावातील नागरिकांमध्ये एकोपा, शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी कार्यरत असलेल्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पेंदोर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

गावातील विविध सामाजिक प्रश्न, किरकोळ वाद-विवाद तसेच आपापसांतील मतभेद संवादातून आणि सामोपचाराने सोडविण्याच्या दृष्टीने तंटामुक्त समितीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. या पार्श्वभूमीवर मंगेश पेंदोर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, नागरिकांमध्ये परस्पर सहकार्याची भावना वाढविणे, सामाजिक एकोपा मजबूत करणे तसेच गावात निर्माण होणारे वाद सामंजस्याने मिटविण्यासाठी प्रयत्न करणे, या दृष्टीने समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

मंगेश पेंदोर यांच्या नेतृत्वाखाली तंटामुक्त समिती अधिक प्रभावीपणे कार्य करेल आणि गावातील नागरिकांच्या सहकार्याने गोजोली मक्ता गावाची तंटामुक्तीची परंपरा अधिक बळकट होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मंगेश पेंदोर यांचे ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये