गुरुनानक नगर (शीख बेडा) सावंगी मेघे वर्धा येथे जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
यावेळी परिसरातील बालकांसोबत पोलिस विभाग व महिला बाल विकास विभागामार्फत संवाद साधण्यात आला. उपस्थित बालकांना बाल हक्क संरक्षण व चाईल्ड हेल्प लाईन तसेच महिला बाल विकास विभागाच्या योजनाची माहिती आशिष मोडक प्रकल्प समन्वयक चाईल्ड हेल्प लाईन वर्धा, तसेच भरोसा सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी मुलींच्या संरक्षण संदर्भात माहिती दिली उपस्थिताना शिक्षणाचे महत्व पटवून बालकांना उपकृत करण्यात आले, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बालके मैदानी खेळ विसरून बसले आहे त्यांना मैदानी खेळ खेळण्याबाबत जागृत करण्यात आले,नशामुक्त भारत या अभियान अंतर्गत जागृती करण्यात आली
सदर कार्यक्रम मा.सौरव अग्रवाल पोलिस अधीक्षक वर्धा, मा. तृप्ती चव्हाण जिल्हा महिला v बाल विकास अधिकारी वर्धा यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे सहकार्य लाभले, यशस्वीते करिता पो हवा दिवाकर परिमल,माधुरी गायकवाड, चाईल्ड हेल्प लाईनचे कांबळे, घोडराव,शंभरकर राजकुमार सिंग बावरी मुकदर सिंग बाबरी शंकर सिंग बडा बलदेव सिंग तक यांनी प्रयत्न केले.



