पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे 130 गुन्ह्यातील 44 लाख 61 हजारावर देशी व विदेशी आणि बियर दारूचा साठा केला नष्ट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदीच्या 130 गुन्ह्यातील सन 2021ते 2025 या कालावधीत जप्त करण्यात आलेल्या दारूच्या मुद्देमालाचा पंचांसमक्ष नाश करण्यात आला. मा.प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी साहेब वर्धा यांच्या आदेशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांचे आदेश क्रमांक डिडटी 112026 मुद्देमाल विल्हेवाट/अधि/138 वर्धा दिनांक 18/8/2026 अन्वये मुद्देमाल विल्हेवाटीचे आदेश प्राप्त झाल्याने पोलिस स्टेशन सेवाग्राम येथील दारुबंदी गुन्ह्यातील सन 2021 ते सन 2025 पावेतोचे एकूण 130 गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल (1)90 एमएल विदेशी दारूच्या 746 शिश्या, (2)180 एमएल विदेशी दारूच्या 10,031 शिश्या (3)350/375 एमएल विदेशी दारूच्या 103 शिश्या, (4) 750 एमएल विदेशी दारूच्या 49 शिश्या, (5)500 एमएल बिअरचे 762 कॅन, (6) 650 एमएल बिअरच्या 47 बाॅटल (7) तसेच 90 एमएल देशी दारूच्या 4,193 शिश्या अशा मोठ्या प्रमाणातील मुद्देमालाचा समावेश होता.
कारवाईदरम्यान विदेशी व देशी दारू तसेच बिअर गडयात ओतून नष्ट करण्यात आली. प्लास्टिकच्या व काचेच्या बाटल्या तसेच बिअरचे कॅन रस्त्यावरील रोलरखाली टाकून फोडण्यात आले. उर्वरित भंगार साहित्य रिझवान शमीमखान पठाण, संगम चौक एमआयडीसी, वर्धा यांना विकण्यात आले. त्यातून प्राप्त 650 रुपयांची रक्कम शासनाच्या GRAS प्रणालीद्वारे जमा करण्यात आली.
संपूर्ण दारूनाश प्रक्रियेचे छायाचित्रण करण्यात आले असून, पंचनामा तयार करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली.या कारवाई मध्ये उपस्थित असलेले पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे वर्धा व सुनील महाडिक उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा तसेच संजय पाटील अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा एम.ए.शेख निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा देवेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सेवाग्राम राजेश काष्टे राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा अखिलेश यशपाल सहाय्यक फौजदार व मोहरर पोलीस स्टेशन सेवाग्राम वाल्मिक बांबर्डे पोलीस उपनिरीक्षक सेवाग्राम गिरिष वावणे राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा…



