ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची विटंबना करणाऱ्या अज्ञात इस्माच्या विरोधात भीमसैनिकानी केली तक्रार दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे बॅनर अज्ञात व्यक्तीने उखडून घेऊन गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून, संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कविताजयंती उत्सव समिती व भीम टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

घटनेनंतर भीमसैनिकांनी वर्धा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बॅनर उखडून नेणाऱ्या व्यक्तीचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

या वेळी अॅड. हर्षवर्धन गोडघाटे, भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके, विकास जंजाळ, पंकज लभाने अमित नाईक, अमित गजभिये, कन्हैया उइके आदर्श सांगोले, इरफान बेग, अकबर पठाण, चांदखान, निशाद अली, अंकुश गजभिये, अंकुश मुंजेवार प्रशील नागदेवे, साहिल अंबादे पवन धावणे, प्रतीक गजरे, आदर्श रामटेके, प्रशांत रामटेके, सुरज घोडे, स्वप्नील गोटे, सौरव हातोले, सचिन वासनीक आदी उपस्थित होते.

घटनेमुळे परिसरात नाराजी व्यक्त होत असून, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तातडीने संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये