ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर : सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर ता कोरपणा येथे दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दि. २७ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात आला.

मुख्यमंत्रीपदी नयन देवाळकर, तर उपमुख्यमंत्रीपदी नंदिनी अरकीलवार यांची निवड झाली. पर्यावरणमंत्री शिवानी सोनवणे, शिक्षणमंत्री साहिल वासेकर, स्वच्छतामंत्री रागिनी टोंगे, क्रीडामंत्री ईशांत तिडके, आरोग्यमंत्री सुहानी मंडळी आणि सांस्कृतिकमंत्री कशीस मडावी यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मुख्याध्यापक संजय गाडगे सर, पर्यवेक्षक तिरुपती बामणे सर, सांस्कृतिक प्रमुख जीवना आडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने ही निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये