ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे न्यू इंग्लिश अकॅडमी ऑफ जिनियस स्कूल, वर्धा येथे विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेच्या दृष्टीने वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून न्यू इंग्लिश अकॅडमी ऑफ जिनियस स्कूल, वर्धा येथे दिनांक २४ ऑगस्ट २०२६ पासून 03 सप्टेंबर २०२६ पावेतो 3 सत्रा मध्ये विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर’ आयोजित केलेले आहे.

“सुरक्षित रहा, आत्मविश्वासी बना” आणि “स्वतःचे रक्षण, स्वतःचे हात” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, या शिबिरामध्ये विद्यार्थिनींना विपरित व संकटसमयी स्वतःचे रक्षण कसे करावे, याचे तांत्रिक व प्रात्यक्षिकासह सखोल प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या प्रशिक्षणासाठी पोलीस कवायत प्रशिक्षक शिरीन शेख तसेच महिला पोलीस अमलदार वैष्णवी भोयर विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देत आहेत, प्रशिक्षणामध्ये विद्यार्थिनींना विविध प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करावा, संकटाच्या वेळी प्रसंगावधान कसे राखावे तसेच आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना कसा करावा, याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येत आहे.

न्यू इंग्लिश अकॅडमी ऑफ जिनियस स्कूल, वर्धा शाळेतील विद्यार्थिनींची संख्या लक्षात घेता सदर स्वरक्षण शिबिराच्या प्रत्येकी 300 विद्यार्थिनींच्या अशा 3 बॅचेस तयार करण्यात आल्या असून सर्व बॅचेसना टप्प्याटप्प्याने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच स्वसंरक्षण शिबिराची प्रथम बेंच दिनांक २४-०८-२०२६ पासून सुरु झालेली आहे.

मुलींमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढविण्यासाठी पोलीस विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेला हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. पोलीस प्रशिक्षकांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण मिळत असल्याने विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून कौतुक होत आहे. आधुनिक काळात महिला व मुलींना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या शिबिरात खालील महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला:

– भारतीय न्याय संहिता कलम 34 ते 44 नुसार स्वसंरक्षणाचा कायदेशीर अधिकार

– मनगट, गळा, मागून पकडल्यास 5 सेकंदात सुटका करण्याच्या प्रात्यक्षिके

– बॅटन, मिरची स्प्रे तसेच दैनंदिन वस्तूंचा बचावासाठी वापर

– ऑन-ड्युटी व ऑफ-ड्युटी वेळी सतर्कता आणि धोका ओळखण्याचे प्रशिक्षण

– 112 व 1091 या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकांची माहिती या प्रशिक्षणादारम्यान विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे

वर्धा जिल्हा पोलीस दलाने या मोहिमेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील मुला-मुलींसाठी अशाच प्रकारच्या विशेष स्वसंरक्षण शिबिरांचे आयोजन पोलीस दलातर्फे केले जाईल…

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये