सेलू पोलीसांनी ATM कार्डची अदला-बदल करुन फसवणुक करून पैसे काढणाऱ्या परराज्यातील आरोपीस केले हवालात बंद..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 13/07/2026 रोजी तक्रारदार लिलाधर वसंतराव नागपुस्कर वय 43 वर्ष रा. सुकळी (स्टे.) ता. सेलू जि. वर्धा हे मेडीकल चौक सेतू येथील ए.बी.आय. बँकेच्या ए.टी.एम मधुन ए.टी.एम कार्डने रक्कम काढत असतांना दोन अज्ञात आरोपींनी फिर्यादी यांचे ए.टी.एम कार्डचा पिन चोरुन पाहून फिर्यादी यांचे ए.टी.एम. कार्डची आदला-बदल करून फिर्यादी व्यांचे ए.टी.एम. कार्ड द्वारे 16,000/- रु. काढून ए.टी.एम. बाहेर उभा केलेल्या त्यांचे कारने पळुन गेले. तक्रारदार हे घरी गेल्यानंतर त्यांनी फोन पे मध्ये त्यांची शिल्लक स्क्कम तपासली असता 16000/- रु. रक्कम कमी झाल्याचे दिसल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला येवून अज्ञात ईसमांनी त्यांचे ए.टी.एम. कार्डची आदला-बदल करुन त्यामधून पैरौ काढत्याबाबत तक्रार दिलेवरुन पो.स्टे. सेलू येथे अप क्र. 526/2026 कलम 318(4), 3 (5) बि.एन.एस. अन्वये अज्ञात ईसमांविरुध्द गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर गुन्हयाचे तपास दरम्यान अज्ञात आरोपीवां शोध घेणेकामी गुप्त बातमीदार लावून तसेच तांत्रिक पध्दतीने गुन्ह्याचा तपास करत असतांना दि. 23/08/2026 रोजी गुप्त बातमीदार यांचेकडून मिळालेल्या माहीती वरुन सि.टी.टी.व्ही फुटेज मधिल वर्णनाचा एक व्यक्ती हुडकेश्वर नाका परीसर, नागपुर येथे पांढ-या रंगाचे कारने फिरतांना दिसत आहे अशा माहीती वरून श्री. पंकज व वाघोडे ठाणेदार पोलीस स्टेशन सेलू यांचे मार्गदर्शनात तात्काळ एक पथक तयार करुन मिळालेल्या माहीती वरुन नागपुर येथे स्वाणा होवुन आरोपी अजहरुद्दीन ताहीर हुसैन वय 36 वर्ष, रा. टोंका ता. हाथीन जि. पलवल, राज्य हरीयाणा यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन वेगवेगळ्या बँकेचे ए.टी.एम कार्ड, गुन्हा करतांना वापरलेली एक पांढ-या रंगाची कार, मोबाईल व फसवणुक करून घेवुन गेलेली नगदी रक्कम असा एकूण 5,17,000/-रु. चा मुद्देमाल जप्त करुन आरोपीस अटक करुन गुन्ह्यातील इतर आरोपीतांचा शोध घेणे सुरु आहे. सदस्च्या कार्यवाहीने फिर्यादी यांना दिलासा मिळाला असुन सेलू पोलीसांचे परिसरात कौतुक होत आहे.
सदरची कारवाई श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक सा. वर्धा, श्री. सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधिक्षक सा. वर्धा, श्री. सुनिल महाडिक उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा यांचे मार्गदर्शानात श्री. पंकज वाघोडे सपोनि. ठाणेदार पो. स्टे. सेलू, पोलीस अंमलदार मनोहर मुडे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, विनायक गोडे व ओमप्रकाश तल्लारी यांनी केली आहे.



