Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या अमृत काळात रेल्वे स्थानकांचा अत्याधुनिक विकास हा जिल्ह्याकरीता ऐतिहासिक महोत्सव – अहीर

अमृत महोत्सव योजनेअंतर्गत ८० कोटी निधी दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे अहीरांनी मानले आभार

चांदा ब्लास्ट

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असतांना प्रधानमंत्री मान. नरेंद्र मोदी जी यांच्या कार्यकाळात अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील १३०९ रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्याचे ऐतिहासिक कार्य होत असून पहिल्या टप्प्यात ५०८ रेल्वे स्थानकांचा अत्याधुनिक सोयीसुविधांसह विकास होत असून गोंडकालीन वैभव प्राप्त चंद्रपूरातील चंद्रपूर रेल्वे स्टेशन, चांदा फोर्ट व बल्हारशाह या स्थानकांचा विकास ८० कोटी निधीतून होत आहे. त्याबद्दल मा. मोदीजींचे मनःपूर्वक आभार मानतो.

हे कार्य चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांकरीता अनमोल भेट असून केंद्र शासनाचा हा महत्वाकांक्षी उपक्रम एकप्रकारे महोत्सव असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रधानमंत्री मोदीजींच्या शुभहस्ते होऊ घातलेल्या व्हीडीओ कॉन्फ्रेन्सिंग द्वारे भूमीपूजन सोहळ्यापूर्वी आयोजित कार्यक्रमास संबोधित करतांना केले.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चंद्रपूर रेल्वेस्थानकाचा पूनर्विकास या दिमाखदार भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी चंद्रपूर रेल्वे स्टेशनच्या वतीने दि. ६ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित विविध कार्यक्रमास उपस्थित नागरीकांना हंसराज अहीर संबोधित होते. याप्रसंगी चंद्रपूर चे आ. किशोर जोरगेवार, एमईएल कार्यकारी संचालक के. रामकृष्ण, चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त विपीन पालिवाल,चंद्रपूर महाऔष्णीक केंद्राचे मुख्य अभियंता गिरीष कुमारवार, रेल्वेचे सिपीएम विनोद बंगाले,  स्टेशन मास्टर एस.आर.देवगडे, विजय राऊत, रमणिकभाई चव्हाण, राखीताई कंचर्लावार, डॉ. मंगेश गुलवाडे, रघुवीर अहीर, पूनम तिवारी आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना हंसराज अहीर म्हणाले की, प्रधानमंत्र्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात असलेल्या मागणीची या योजनेच्या माध्यमातून परिपूर्ती होणार आहे. या पूनर्विकास योजनेअंतर्गत चंद्रपूर स्टेशनकरीता २७.६६ कोटी, चांदा फोर्ट करीता १६.०० कोटी व बल्हारशाह करीता ३४ कोटी निधी मंजूर झाला असून या योजनेअंतर्गत प्रवाशांच्या सोयीकरीता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. सरकारच्या गतिमान धोरणांस अभिप्रेत असलेले हे काम गुणवत्तापूर्ण व निर्धारीत वेळेतच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांकरीता रेल्वेच्या अनेक सोयी-सुविधा देता आल्या मात्र कोरोना काळात दुर्भाग्याने अनेक महत्वाच्या गाड्या बंद पडल्या त्या पूर्ववत करण्याचा कसोशिने प्रयत्न करु,. तिसऱ्या  लाईनचे काम पूर्ण होत आहे, पिटलाईन पूर्णत्वास आली असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या  अनेक गाड्या बल्हारशाह येथून सुटणार आहेत. आपल्या ऋणांची परतफेड करणे हे कर्तव्य असून त्याकरीता सदैव कटिबध्द राहील. चंद्रपूर, बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचा पूनर्विकास पहिल्या टप्प्यात होत आहे हा सौभाग्याचा क्षण आहे. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या व मान्यवर अतिथिंच्या शुभहस्ते विद्यार्थ्याना भेटवस्तू देण्यात आली.

या प्रसंगी आ. किशोर जोरगेवार यांनी केंद्र सरकारच्या या योजनेचे स्वागत करुन हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून अमृत भारत योजनेत तेही पहिल्या टप्प्यात चंद्रपूर, चंादा फोर्ट व बल्लारपूर रेल्वे स्टेशन अत्याधुनिक सोयींनी स्वयंपूर्ण होणार असल्याचे सांगीतले. या कार्यक्रमास राजू घरोटे, राजेंद्र अडपेवार, संजय कंचर्लावार, विनोद शेरकी, सुभाष कासनगोट्टुवार, संदीप आवारी, रवि आसवानी, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, रवि लोणकर, वंदना संतोषवार, गौतम यादव, सुदामा यादव यांचेसह रेल सुविधा संघर्ष समितीचे रमेश बोथरा, नरेंद्र सोनी, डाॅ गोपाल मुंधडा, डाॅ भूपेश भलमें व शहरातील विविध क्षेत्रातील गनमान्य नागरीक उपस्थित होते. 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये