ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेकोली खानीतुन चोरीस गेलेल्या दोन बॅटरी चोरांना अटक

माजरी पोलिसांची कामगीरी ; चोरी गेलेला माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

तालुक्यातील माजरी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या वेकोली न्यू माजरी एन एम ओ सी खानीतुन सहा दिवसा अगोदर डोझर सेक्शन मधून उभे असलेले डोझर क्र. 13416 ची. 8,600/- रु कि.ची बॅटरी रात्रदरम्यान अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घटना घडली होती. बॅटरी चोरुन नेल्याबाबत सुरक्षा रक्षक संकेत विनोद लेडांगे रा.चरुरखटीक यांनी माजरी पुलिस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसानीं अप क्र. 102/23 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करूँन शोध मोहिम शुरू केले.

गुन्ह्यासंबधाने माजरी शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक भोजराम लांजेवार, पोलिस हावलदार तुराणकर यांनी तांत्रित तपास करुन सदर चोरीचा उलगडा केला असुन गुन्ह्यातील आरोपी नामे सागर भाऊराव कुमरे रा. आंबेडकर वार्ड माजरी, सुरज कुमार व्यासमुनी राम वय. 20 वर्षे माजरी कॉलरी यांना अटक करण्यात आलेली असुन त्यांचेकडुन एक 8,600/- रु कीमतीच्या 12 व्हॅट ची बॅटरी व गुन्ह्यात वापर झालेली होंडा साइन 30,000/- रु कीमतीच्या मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार सपोनि अजितसिंग देवरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा. रमेश तुराणकर करित आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये