ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगरपंचायतीला आली जाग; भरती झाल्यानंतर लावली जाहिरात!

पोंभुर्णा नगरपंचायतीच्या CLTC पदभरतीची जाहिरात उशिराने प्रसिद्ध; प्रक्रियेवर चर्चेला उधाण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

 पोंभुर्णा नगरपंचायतीतील CLTC अभियंता पदभरतीबाबत एक वेगळीच बाब समोर आली असून, भरतीची प्रक्रिया झाल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.*

पदभरतीची जाहिरात सर्व पात्र उमेदवारांना माहिती मिळावी आणि त्यांना अर्ज करण्याची समान संधी मिळावी यासाठी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी प्रसिद्ध होणे अपेक्षित असते. मात्र पोंभुर्णा नगरपंचायतीकडून *भरती झाल्यानंतर नगरपंचायत नोटिस बोर्ड वर जाहिरात लावण्यात आल्याने “नगरपंचायतीला आता जाग आली का?”* अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

CLTC अभियंता पदासाठी जाहिरात नेमकी कधी काढण्यात आली, भरतीची प्रक्रिया त्यापूर्वीच पूर्ण झाली होती का आणि जाहिरात नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करण्यास विलंब का झाला, याबाबत नगरपंचायत प्रशासनाने स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे,नोटीस बोर्ड वर जाहिरात उशिराने प्रसिद्ध झाल्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेल्या इतर पात्र अभियंत्यांना अर्ज करण्याची संधी मिळाली का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.

*भरतीची जाहिरात आधी आणि निवड प्रक्रिया नंतर*, ही पारदर्शक पद्धत अपेक्षित असताना येथे नेमके उलटे चित्र दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आता नगरपंचायत प्रशासन या प्रकाराबाबत काय स्पष्टीकरण देते, याकडे पोंभुर्णा शहरातील नागरिकांचे आणि पात्र अभियंत्यांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये