महिलेच्या विनयभंग प्रकरणात आरोपीला एक दिवस कारावास व एक हजार रुपयांचा दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : महिलेचा विनयभंग करून तिच्या चुकून उजव्या हाताला काठी मारून जखमी केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत एक दिवस साधा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणातील आरोपी प्रमोद सुखदेव चुनारकर (वय ४४, रा. सिद्धार्थनगर, वर्धा) याच्याविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. ०३/२०२२ अन्वये भादंवि कलम ३२४ व ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी अविनाश धर्मपाल रामटेके (वय २६, रा. सिद्धार्थनगर, वर्धा) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली होती.
प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शैलेश चाफलेकर यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अमन पटण यांनी कामकाज पाहिले. साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यासाठी पोलीस अंमलदार मंगेश्वर मोघळेवार व पोलीस नाईक यांनी सहकार्य केले. तसेच पोलीस निरीक्षक.श्री. नागेशकुमार चतरकर पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी साक्षीदारांना प्रभावी साक्ष देण्यासाठी मार्गदर्शन केले.
वर्धा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री. विक्रांत खंडारे यांनी आरोपीला कलम ३२४ व ५०४ अंतर्गत दोषी ठरवत एक दिवस साधा कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
ही कारवाई वर्धा शहर पोलिसांच्या तपास व न्यायालयीन पाठपुराव्यामुळे यशस्वी झाली.



