जीनिंग मधील 03 चोरीचे गुन्हे करणारा बादशाहसिंग टाक व त्याचा साथीदार राजेंद्रसिंग बाबरी हा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पो.स्टे. तळेगाव (शा.पु.), ता. आर्वी, जि. वर्धा येथे दि. 17/12/2025 ते 18/12/2025 च्या रात्री दरम्यान पो.स्टे. तळेगाव् (शा.पं.) हद्दीतील तळेगाव (शा.पं.) ते आर्वी रोजवर असलेल्या श्रीनाथ जिनिंग व प्रेसिंग या कंपनीमध्ये अज्ञात गुन्हेगारांनी प्रवेश करून रु. 12,10,270/- चा ऐवज चोरुन नेला. याबाबत पो.स्टे. तळेगाव (शा.पं.) येथे अप. क्र. 666/25 कलम 334(1), 304(3) भा.न्या.सं. अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तसेच दि. 18/01/2026 ते 19/01/2026 रोजीच्या रात्री दरम्यान याच परिसरातील जगदंबा जिनिंग व निरंकर जिनिंग य दोन जिनिंगमधून अज्ञात इसमांनी चोरी करून एकूण रु. 17,15,476/- चा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत पो.स्टे. तळेगाव (शा.पं. येथे अप. क्र. 32/26 कलम 334(1), 304(3) भा. न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर दोन्ही गुन्ह्यांमध्ये कोणताही तांत्रिक पुरावा उपलब्ध नसल्याने पोलिसांनी गोपनीय माहितगारांचे माहीचीचे आधा माहीती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार बादशाहसिंग अजाबसिंग टाक, रा वडाळी, अमरावती याचे नातेवाईक तळेगाव (शा.पं. येथे राहत असून घटनेच्या साधारण आठ दिवस आधी बादशाहसिंग अजाबसिंग टाक हा नातेवाईकांकडे तळेगाव (शा.पं.) येथे येवुन गेला होता. त्यावेळी त्याने जिनिंगची रेकी केली होती. त्यानंतर सदर गुन्हा हा त्याने त्याचा सहकारी राजेंद्रसिंग बाबरी, रा बडनेरा, जि. अमरावती याचे सोबत केला असल्याची माहिती मिळाल्याने दि.27/06/2026 रोजी स्था.गु.शाखा चे पथकाने राजेंद्रसिंग बाबरी यास त्याचे राहते घरुन ताब्याच घेवुन सखोल विचारपुस केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्याने बादशाहसिंग अजाबसिंग टाक याच्यासोबत सदर 03 जिनिंगमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान बादशाहसिंग अजाबसिंग टाक व ईतर २ साथीदार चोरी केली असल्याचे सांगीतले.
तसेच दि. 17 जुलै 2026 ते 18 जानेवारी 2026 या रात्री जिनिंगमध्ये चोरी करण्याचे एक दिवस आधी चारही आरोपीतांन पो.स्टे. शेगाव, जि. बुलढाणा हद्दीतून एक व्हॅगनर कार चोरी केली असल्याचे सांगीतल्याने सदर आरोपीला गुन्ह्यात अटक करुन पुढील तपासकामी पो.स्टे. तळेगाव (शा.पं.) याचे ताब्यात देण्यात आले होते.
दि. 05/08/2026 रोजी गुन्ह्यातील मुख्य आरोपी बादशाहसिंग अजाबसिंग टाक, वय 41 वर्षे, रा. वडाळी, अमरावत यास बडनेरा, जि. अमरावती येथून ताब्यात घेऊन पुढील तपासकामी पो.स्टे. तळेगाव (शा.पं.) याचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विनोद चौधरी, स्था.गु.शा. वर्धा, पो.उप.नि.शिनुकुनार बानोत, पोहवा. नरेंद्र पाराशर, पो. अंमलदास मीथुन जिचकार, दिपक साठे, प्रफुल पुनवटकर यांनी केली आहे.



