ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाआरोग्य शिबिराला पोंभुर्ण्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

२,१५५ नागरिकांची नोंदणी; १,५३५ चष्म्यांचे वाटप, २८७ शस्त्रक्रियांसाठी रुग्णांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

 मा. आमदार डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला पोंभुर्णा येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण २,१५५ नागरिकांची नोंदणी करण्यात आली असून १,५३५ नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध आजारांवरील उपचारासाठी २८७ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.

या महाआरोग्य शिबिराचे आयोजन मा. आमदार देवरावदादा भोंगळे मित्र परिवार, पोंभुर्णा यांच्या वतीने करण्यात आले होते.

कार्यक्रमाला मा. आमदार देवरावदादा भोंगळे (राजुरा विधानसभा), डॉ. मिलिंद कांबळे (अधिष्ठाता, मेडिकल कॉलेज चंद्रपूर), डॉ. कटारे (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. मुंदडा, सत्यजित आमले (पोलीस उपविभागीय अधिकारी), डॉ. अजय कन्नाके (ग्रामीण रुग्णालय, पोंभुर्णा), डॉ. बावणे (तालुका वैद्यकीय अधिकारी), डॉ. घरडे (शालिनी मेघे हॉस्पिटल, नागपूर) तसेच डॉ. रुपलानी (लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी तालुका भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये