वर्धा जिल्ह्यामध्ये दामिनी पथकाचे उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हयामध्ये महिला व मुलींचे संरक्षणाकरिता दामिनी पथक स्थापन करण्यात आले आहे. दामिनी पथक हे शाळा, महाविदयालये, मुलींचे व महिलांचे वस्तीगृह बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, प्रेक्षनिय स्थळे, खाजगी क्लासेस, मोकळे मैदाने, इत्यादी ठिकाणी भेटी देवुन महिला व मुलींच्या मदतीसाठी हजर येतात.
आज दिनांक ३०/७/२०२६ रोजी अग्रग्रामी कॉन्व्हेंट स्कूल मसाळा येथे मुलींकरिता स्वसुरक्षा, सायबर सुरक्षा, वाहतूक सुरक्षा तसेच पोक्सो कायदा अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच लायन्स ट्रॅडिशनल शतकोन कराटे असोसिएशन वर्धा चे कोच श्री. उल्हास वाघ सर यांच्या मार्फतीने व प्रशिक्षित मुलीच्या साह्याने सर्व विद्यार्थिनींना self Defence बाबत प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली व माहिती देण्यात आली. एकूण अंदाजे २५० विद्यार्थीनी व शिक्षिका हजर होत्या.

दिनांक ३१-७-२६ रोजी स्व. लक्ष्मणराव मानकर आदिवासी निवासी आश्रम शाळा वडगाव जंगली जिल्हा वर्धा येथे मुख्याध्यापक यांच्याशी भेट घेऊन विद्यार्थ्यांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच निवासी असलेल्या इयत्ता आठवी ते बारावीच्या मुलींना स्वसुरक्षे संदर्भात व्हिडिओ दाखवून त्यांच्याशी निगडित विषयावर त्यांना योग्य ती माहिती देण्यात आली. तसेच त्यांना बालविवाह बाबत माहिती देण्यात आली. सदर जनजागृती कार्यक्रमास एकूण अंदाजे १६० मुली हजर होत्या



