वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शेतकऱ्यांना औषधांचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- वाढदिवस हा केवळ उत्सवाचा नव्हे, तर समाजसेवेचा दिवस ठरावा या उद्देशाने युवा नेते केशव गोविंदराव कुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त येरमी-येसापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पौष्टिक आहाराचे, तर परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक फवारणी औषधांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन व पौष्टिक आहाराचे वितरण करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. तसेच परिसरातील शेतकऱ्यांना शेतीतील फवारणीसाठी आवश्यक औषधांचे वाटप करून शेतीला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व शेतकऱ्यांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.
कार्यक्रमास कृषी विभाग आत्मा सल्लागार समितीचे अध्यक्ष भरत ज्ञानोबा बिरादार, सुनील शेळके, भीमराव कुमरे, चंदू कुमरे, मीराबाई कुमरे, भागुबाई कुमरे, फुलाबाई कन्नके, शिक्षक लिंगोराव सोयम आणि पीयूष जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाढदिवसाचे औचित्य साधून शिक्षण व शेती या समाजाच्या दोन महत्त्वाच्या घटकांना हातभार लावणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला. सामाजिक बांधिलकीची जपणूक करत समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



