जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा चा शिष्यवृत्ती परीक्षा चा निकाल 100 टक्के

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :- सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा या शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून ईशानी भिमराव आत्राम या विद्यार्थिनीने 192 गुण घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. हे यश विद्यार्थ्यांची मेहनत, शाळेचे शिक्षक गोविंद पेदेवाड व संजू तोडासे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य तथा शाळेच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे फलित आहे.केवळ शिष्यवृत्ती परीक्षेतील यशच नव्हे तर शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम व सातत्यपूर्ण गुणवत्ता यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात सकारात्मक बदल घडून आला आहे.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थी,मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांचे गटशिक्षणाधिकारी कल्याण जोगदंड,केंद्रप्रमुख पंढरी मुसळे यांनी अभिनंदन केले .गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि समर्पित शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्ना मुळेच उज्वल भविष्य घडते.हे जि. प. लालगुडा शाळेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविल्या बद्दल कौतुक करण्यात येत आहे.



