ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुसळधार पावसामुळे पानटपरीचे मोठे नुकसान

प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना :- तालुक्यात कोडशी येथील गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच एका घटनेत कोडशी येथील बस स्टँड परिसरात असलेल्या प्रफुल्ल भाऊराव निमकर व संदीप महादेव मालेकर यांच्या पानटपरीवर सुमारे दीडशे वर्षे जुने चिंचेचे झाड अचानक कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
झाड कोसळल्याने पानटपरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून विक्रीसाठी ठेवलेले साहित्य, फर्निचर, तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून त्यांचा उदरनिर्वाहाचा मुख्य आधारच हिरावला गेला आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व स्थानिक प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. जेसीबीच्या सहाय्याने झाड हटविण्याचे काम करण्यात आले. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून आर्थिक मदत व योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तसेच गावातील धोकादायक व जीर्ण वृक्षांचे सर्वेक्षण करून वेळेत छाटणी अथवा हटविण्याची कार्यवाही करावी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील, अशीही मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये