जायंट्स सहेलीच ग्रूपच्या वतीने विद्यार्थिनींना गणवेश वाटप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जायंटस वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन दोन ब च्या अंतर्गत देऊळगावराजा जायंटस ग्रुप व सहेली ग्रुपच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात तालुक्यातील विविध शाळेतील जवळपास 400 विद्यार्थी व विद्यार्थिनीना गणवेशाचे वाटप केले आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने शहरात गेल्या 35 वर्षात विविध क्षेत्रात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले आहे.
स्थानिक कमला नेहरू विद्यालयातील विद्यार्थिनींना दिनांक सात जुलै 2026 रोजी गणवेशाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी फेडरेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितताना मार्गदर्शन करताना स्पेशल कमिटी मेंबर ॲड.पुरुषोत्तम धन्नावत यांनी संस्थेमार्फत सुरू असलेल्या सर्वच उपक्रमांची सविस्तर माहिती देऊन अवयव दान मध्ये आतापर्यंत या ग्रुपच्या वतीने 160 नागरिकांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेण्यामध्ये यश मिळवले आहे असे सांगून या मरनोत्तर नेत्रदानामुळे 320 अंध व्यक्तींना हे सुंदर जग पाहण्याची संधी केवळ जायंटस परिवाराच्या वतीने मिळाल्याचे त्यांनी सांगितले. देहदान करून घेण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथील संबंधित यंत्रनांशी संपर्क करून ज्या नागरिकांना देहदान करायचे आहे.
त्यास तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी जायंटस परिवार सर्व सहकार्य करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले कार्यक्रमास फेडरेशनचे अध्यक्ष जुगल किशोर हरकूट,सचिव सन्मती जैन, ग्रुपचे अध्यक्ष किशोर आंबुसकर, सहेली ग्रुपच्या उपाध्यक्ष सौ. मालती रमेश कायंदे, सचिव लता हरकुट ,ज्योती आगेवाल, वैशाली भावसार, ग्रुपचे मरणोत्तर नेत्रदान चळवळीचे प्रमुख डॉक्टर अशोक काबरा, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, उद्योजक मनीष काबरा, नगरपरिषद चे बांधकाम समिती सभापती विष्णू झोरे, दामोदर राठी, अशोक आगेवाल, संजय डोनगावकर, अरुण कायस्थ, श्याम गुजर, कल्याण चांडगे, राजेश तायडे, उपस्थित होते. याप्रसंगी या विद्यालयाच्या सर्वच शिक्षक वृंदानी सहकार्य केले.



