केपीसीएल कोळसा खाण परिसरातील गावे होणार हिरवीगार
सामाजिक दायितवातून गावकरी व शेतकऱ्यांना रोपट्याचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरालगत असलेल्या कर्नाटक पावर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बराज खुल्या कोळसा खाण व्यवस्थापनाकडून खान परिसर आणि परिसरातील गावांमध्ये वृक्षाचछादन वाढविण्याचा अभिनव उपक्रम पर्यावरण विभाग प्रमुख आनंदकुमार राय यांनी हाती घेतलेला आहे. सामाजिक दायितव्यातून गावामध्ये व शेतकऱ्यांना रोपट्याचे वाटप केले जात असून काही दिवसातच हा परिसर हिरवागार होणार आहे .कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून परिसरातील गावांमध्ये पर्यावरण संरक्षण व विकासाच्या दृष्टीने ग्रीन बेल्ट विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या माध्यमातून बराज खुल्या कोळसा खाण परिसरातील गावांमध्ये पर्यावरण विभाग मोहिमे अंतर्गत विविध फळांचे रोपटे, बारमाई हिरवे राहणार रोपटे व सामाजिक वनीकरण अंतर्गत लावण्यात येणाऱ्या रोपट्याचे वितरण पर्यावरण विभाग प्रमुख आनंद कुमार राय यांच्या मार्गदर्शनात केले जात आहे.
या मोहिमेत सामाजिक दायित्वातून खान परिसरातील गावांमध्ये गावकरी आणि शेतकऱ्यांनाही सहभागी करून घेतले जात असून त्यांना रोपट्याचे वितरण केले जात आहे .या वृक्षारोपण मोहिमेमुळे परिसरातील प्रदूषण नियंत्रण नियंत्रणात राहणार आहे, आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे.



