ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्मयोगी अँड. पं, गणेशदत्त तिवारी यांच्या ४१ व्या स्मृतिप्रित्यर्थ ब्रह्मपुरीत निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :- कर्मयोगी अँड पं, गणेशदत्त तिवारी यांचा ४१ वा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गणेश दत्त तिवारी हे जनसेवेचे व्रत जोपासणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या स्मृतीतील आठवणी कायमस्वरूपी स्मरणात राहाव्यात म्हणून ब्रह्मपुरीतील पेठवार्ड येथील त्यांच्या निवासस्थानी जनसेवा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक ७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रेल्वे स्टेशन रोड जवळील पेठ वार्डातील तिवारी हाऊस मध्ये निशुल्क भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ब्रह्मपुरीतील अशोक नेत्रालयातील तज्ञ डॉक्टरांच्या चूम कडून रुग्णांच्या डोळ्याची तपासणी केली जाईल. सोबतच औषधी वितरण व मोतीबिंदू आपरेशन साठी पात्र आवश्यक रुग्णावर निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

त्यासाठी स्वर्गीय गणेश दत्त तिवारी सन्मान कार्ड रुग्णांना दिल्या जाईल. त्या कार्डवर निशुल्क ऑपरेशनची व्यवस्था ब्रह्मपुरीतील अशोक नेत्रालयात केली जाणार आहे. त्यामुळे आता नागपूर, वर्धा,सावंगी, येथे रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जाण्याची गरज भासणार नसून ब्रह्मपुरीतच सन्मान कार्डवर निशुल्क अशोक नेत्रालयात ऑपरेशन होणार आहे. तरी जास्तीत नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तिवारी परिवार आणि अशोक नेत्रालयातर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये