चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकर यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

चांदा ब्लास्ट
तिरळे कुणबी (पाटील) समाज संघटना, झरी- जामनी द्वारा पुरस्कुत संत बाजीराव महाराज बहुउद्देशीय संस्था, मुकुटबन यांच्या द्वारे आयोजीत भव्य तालुकास्तरीय तिरळे कुणबी समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला मला आयोजित करून तिरळे कुणबी समाजचा समाजभूषण पुरस्कार प्रदान केला त्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार. तसेच तालुकास्तरीय नवनिर्वाचित नगरपरिषद सदस्य, तेलंगणातील सर्व सरपंच, शासकीय सेवेत कार्य करणारे, 10 वी 12वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सह 175 समाज बांधवांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकनेत्या सौ. संगीता खांडेकर चंद्रपूरच्या प्रथम नागरीक महापौर यांचा समाजभुषण पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष देविदास गायकवाड, श्रीधर पाटील गोडे, नरेंद्र ठाकरे, राजुभाऊ बुटले, राजेंद्र खांडेकर, डॉ. अनिल ताटे, नागोराव राऊत, मनिष पाटील, सुधाताई ठाकरे, निलेश चौधरी, शुभम राऊत, विजयराव सावापूरे, विनोदराव गोडे, मुर्लीधर कडू, आशिष राऊत, माधवराव उदार.



