ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासरचनेतील व्हर्टिकल्स विषयांचा शिक्षक कार्यभारात समावेश करा 

गोंडवाना यंग टीचर्स संघटनेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

-गोंडवाना विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलेले असून उच्च शिक्षणात बहुविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र सद्यस्थितीत शिक्षकांच्या कार्यभाराचे सर्वकष निर्धारण न झाल्यामुळे शिक्षकांच्या कार्यभारामध्ये असंतुलन व अनिश्चितता आढळून येत आहे.

   या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील अभ्यास रचनेत मेजर ,मायनर व मुख्य विषयाशी निगडित इतर व्हर्टिकल्स विषय घटकांचा शिक्षक कार्यभारात समावेश करण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यावेळी कुलगुरू महोदयांनी सदर समस्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

           सद्यस्थितीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मुख्य विषयाशी निगडित इतर वर्टीकल्स विषय जसे व्हिएसशी, एसइसी, व्हिईसी, ओई, आयकेस, या विषयांचा शिक्षकांच्या कार्यभारामध्ये समावेश नसल्याने शिक्षकांचा कार्यभार अनिश्चित स्वरूपाचा झाला आहे. या संदर्भात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परिपत्रक काढून मुख्य विषयाशी निगडित सर्व व्हर्टिकल्स विषयांचा शिक्षकांच्या कार्यभागामध्ये समावेश केला आहे याकडे संघटनेने कुलगुरू महोदयांचे लक्ष वेधले आहे.

   या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाने सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मुख्य विषयाशी निगडित अभ्यासक्रमात असलेल्या व्हर्टिकल्स विषय घटकांचा शिक्षकांच्या कार्यभागामध्ये समावेश करण्याची मागणी केली असून यासंदर्भात गोंडवाना यंग टीचर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे, सचिव डॉ.विवेक गोरलावार,उपाध्यक्ष डॉ. विजय वाढई,डॉ. अक्षय धोटे डॉ. सतीश कन्नाके,डॉ.प्रकाश शेंडे डॉ. शरद बेलोरकर, डॉ. प्रकाश शेंडे डॉ.निलेश चिमुरकर,डॉ.माधव कांडणगिरे इत्यादी संघटनेच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने कुलगुरू महोदय यांना निवेदन दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये