ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पितृछत्र हरविलेल्या मुलीला शैक्षणिक दत्तक

महिला बचत गट सदस्यांना मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात “जनसेवा दिन सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत संपूर्ण आठवडाभर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज (दि.१) ला जनसेवा दिन सप्ताहाच्या सहाव्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील पितृछत्र हरविलेल्या गरीब मुलीला शिक्षणाकरिता दत्तक घेण्यात आले तर गावोगावीच्या महिला बचत गटाच्या महिलांच्या भेटी घेवून मार्गदर्शन करण्यात आले.

भद्रावती तालुक्यातील विलोडा येथील भारती प्रकाश चौधरी यांचे पती प्रकाश शत्रुघ्न चौधरी यांचे शेतात गाळण करताना ट्रॅक्टर पलटल्याने ट्रॅक्टर खाली दबून मृत्यु झाला.  घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर अडचणींचा डोंगर निर्माण झाला. दुसरीकडे शेतात सतत नापिकी होत आहे. परिणामी घरात अनेक आर्थिक अडचणी सुरू आहे. अशात मुलीचे शिक्षण करणे जड झाले आहे. ही माहिती कळताच शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी या कुटुंबाची भेट घेतली व या कुटुंबातील मुलगी भूमी प्रकाश चौधरी हिच्या शिक्षणाची संपूर्ण जवाबदारी स्वीकारून दत्तक घेण्यात आले.

त्यानंतर वरोरा तालुक्यातील विविध गावात जावून महिला बचत गटात काम करणाऱ्या महिलांच्या भेटी घेवून त्यांना आर्थिक उन्नती बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी चंद्रपूर जिल्हा महिला संघटीका सौ. नर्मदाताई बोरकर, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हा प्रमुख भास्करभाऊ ताजने, विधानसभा संघटक मंगेश उर्फ श्रीहरी भोयर, वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, शिवसैनिक तथा माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, शहर प्रमुख गजानन ठाकरे, विभागप्रमुख चंद्रशेखर ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल वाढई, निखिल मांडवकर, अभिजित कुळे, वैभव घोडमारे यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये