ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी दि. 1ऑगस्ट 2023 रोजी गुरुकुल महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात साजरी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश डोंगरे, प्रा. सचिन कणॅवार, बारसागडे सर, खोके सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुशांत खिरटकर, प्रफुल मुसळे, संतोष चौधरी, ननिता बुरान, शालिक कांबळे, प्रशांत नवले, सविन मडावी, गजानन आत्राम, अनिल कोसरे, भास्कर गोंडे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये