ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेच्या मागणीची दखल

आमदार सुधाकर अडबाले आणि आमदार अभिजीत वंजारी यांची विधान परिषदेत अर्ध्या तासाची चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

-राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांचा कार्यभार निश्चित करून पद मान्यतेची त्रुटी दूर करणे,गोंडवाना विद्यापीठामध्ये स्वतंत्र स्थायी स्वरूपात सहसंचालक (उच्च शिक्षण )यांचे कार्यालय निर्माण करणे , ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट केंद्राची निर्मिती करणे, एक जानेवारी 1994 ते 11 जुलै 2009 या कालावधीत सेवेत असलेला एम.फील.प्राध्यापकांना कॅस चे लाभ मंजूर करणे, व इतर विविध समस्येबाबत गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेने वेळोवेळी सातत्याने मागणी केली होती.

या मागणीची दखल शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले व पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी यांनी घेतली असून विधान परिषदेमध्ये तालिका नंबर 9 क्रमांकावर सदर समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केला असून यावर चर्चा होत आहे. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोरलावर यांनी निवेदनाच्या माध्यमातून सातत्याने मागणी करून आमदार महोदय यांचे लक्ष वेधले होते.यावेळी संघटनेचे पदाधिकारी डॉ.सतीश कन्नाके,डॉ.विजय वाढई,डॉ.राजेंद्र गोरे,डॉ.रुपेश कोल्हे,डॉ.अभय लाकडे,डॉ.राजू किरीमिरे,डॉ.किशोर कुडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केल्याने विविध विषयाचे पदमान्यतेत अनेक त्रुटी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे अनेक प्राध्यापकांच्या नोकऱ्या धोक्यात येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीची निर्मिती करण्यात आली.

मात्र स्वतंत्र सहसंचालक यांचे कार्यालय नसल्याने अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट केंद्र मार्फत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करिता विविध प्रशिक्षणाची सोय व्हावी यासाठी ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट सेंटरची मागणी करण्यात आलेली होती. तसेच 1 जानेवारी 1994 ते 11 जुलै 2009 या कालावधीत सेवेत असलेल्या एमपील अर्थात प्राध्यापकांना कॅशची लाभ मंजूर करण्याबाबत इतर विविध समस्येबाबत संघटनेच्या वतीने वेळोवेळी मागणी करण्यात आलेली होती.

या पार्श्वभूमीवर शिक्षक आमदार सुधाकर कडबाले व पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट अभिजीत वंजारी यांनी संघटनेच्या विविध मागणीची दखल घेतली असून विधान परिषदेमध्ये या संदर्भात प्रश्न तालिकेतील क्रमांक 9 नंबर वर उपरोक्त विविध समस्या बाबत प्रश्न दाखल केलेला आहे हे गोंडवाना यंग टीचर्स संघटनेच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.या संदर्भात संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदन देण्यात आलेले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये