ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुंभारी येथे ‘कृषी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

समर्थ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये १ जुलै ‘कृषी दिन’ अत्यंत उत्साही आणि भारावलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला. देऊळगाव राजा येथील समर्थ कृषी महाविद्यालयाच्या ‘रावे’ (RAWE) अंतर्गत असणाऱ्या कृषीकन्यांनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, उपप्राचार्य देवानंद नागरे, आणि रावे समन्वयक प्रा.मोहजित सिंग राजपूत यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पवार सर व मुळे मॅडम, तसेच अंगणवाडी सेविका आशा जाधव आणि गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद . शाळेचे शिक्षक पवार सर यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना आणि कृषीकन्यांना शेतीचे महत्त्व सांगत अत्यंत मोलाचे व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच गौरी सोळंकी हिने कृषी दिन आपण का साजरा करतो यावर मनोगत व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या:तृप्ती मोर, सृष्टी करडे, अवंती देशमुख, गौरी सोलंकी, मयुरी झाडे, अंकिता काळे माधुरी दूनगहू, यांनी अथक परिश्रम घेतले. कृषीकन्यांनी अतिशय व्यवस्थित नियोजन करून गावामध्ये कृषी दिनाचा उत्साह वाढवला. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये