ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आर्वी येथे दारूबंदी पथकाची मोठी कारवाई

५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष दारूबंदी मोहिमेअंतर्गत दि. 20 जून 2026 रोजी आर्वी पोलीस ठाणे हद्दीतील मोजा गोईवाडा शेतशिवारात दारूबंदी पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत आरोपी प्रमोद अंबादास लादे (वय 60 वर्षे, रा. जनता नगर, आर्वी) याच्यावर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी शेत परिसरात छापा टाकला असता 12 प्लास्टिक ड्रममध्ये साठवून ठेवलेले सुमारे 2,400 लिटर गावठी मोहाचे रसायन (सडवा), गावठी मोहाची दारू तसेच भट्टी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. यावेळी पोलिसांनी एकूण 5 लाख 15 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन आर्वी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल वर्धा व अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी पथक आर्वी उपविभागाचे सपोनि पद्माकर मुंडे, पोउपनि कल्पेश मगरे, पो.हवा. राजेश पाचरे, पोशि प्रतीक नगराळे, मपोशि शिल्पा राउत व चालक पोशि शुभम बहादुरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

या धाडसी कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून जिल्ह्यातील दारूबंदी मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये