ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाबगाव येथे महिला मेळाव्यात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : सामुदायिक आरोग्य विभाग, माहात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान, सेवाग्राम यांच्या वतीने वाबगाव, ता. देवळी, जि. वर्धा येथे आयोजित महिला मेळाव्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन, वर्धा यांच्या मार्फत सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथील पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार सदर कार्यक्रमास महिला पोलीस हवालदार मिना कौरती व पोलीस अंमलदार अंकित जिभे यांनी उपस्थीत राहून महिला नागरीकांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

नमुद कार्यक्रमात सोशल मिडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाईन आर्थिक फसवणूक, महिलांची ऑनलाईन छेडछाड, बनावट कॉल्स, ओटीपी फसवणूक, फेसबुक व इन्स्टाग्राम खाते हॅकिंग, फेक लिंकद्वारे होणारी फसवणूक तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच सायबर गुन्ह्याला बळी ठरल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपस्थित महिला नागरीकांना करण्यात आले.

या कार्यक्रमास सुमारे १२० महिला नागरीक उपस्थित होत्या. कार्यक्रमाद्वारे महिलांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली असून सुरक्षित डिजिटल व्यवहारांबाबत महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक संस्थेचे तसेच उपस्थित महिला नागरीकांचे सायबर पोलीस स्टेशन, वर्धा यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

– सायबर पोलीस स्टेशन, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये