ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तळेगाव पोलिसांची मोठी कारवाई ६ लाख ४५ हजारांचे मोहा रसायन व गावठी दारूचे साहित्य जप्त!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस दलाने अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत विशेष दारूबंदी पथक , आर्वी उपविभाग यांनी एक मोठी कारवाई केली आहे. दिनांक १४ जून २०२६ रोजी तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा जामनेर शिवारात ही धडक कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, विशेष दारूबंदी पथकाने मौजा जामनेर शिवारातील आरोपी राजू बाष्टीघाट (रा. तळेगाव) याच्या शेतामध्ये अचानक छापा (रेड) टाकला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी शेतातून २४ लोखंडी ड्रममध्ये साठवून ठेवलेला ४,००० लिटर मोहा रसायन सडवा आणि गावठी हातभट्टीची दारू गाळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या या एकूण मुद्देमालाची किंमत ६,४५,६००/- रुपये (सहा लाख पंचेचाळीस हजार सहाशे रुपये) आहे.

या प्रकरणी आरोपी राजू बाष्टीघाट याच्याविरुद्ध तळेगाव पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची धडक कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी पथक आर्वी उपविभागाचेः सपोनि पद्माकर मुंडे, पोउपनि कल्पेश मगरे, पो. हवा. राजेश (ब.नं. १४७८), पो.शि. प्रतिक (ब.नं. २०३), मपोशि शिल्पा (ब.नं. १४७६), चालक पो. शि. सूरज भागने (ब.नं. ४९१) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

(आशिष चिलांगे) सहायक जनसंपर्क अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये