ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रम दत्तपूर येथे ‘Self Empowerment’ व ‘Mental Health’ शिबिराचे यशस्वी आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक ०३ जून २०२६ रोजी, सकाळी ०७.३० ते ०९.३० या वेळेत प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रम, दत्तपूर येथे Self Empowerment’ (आत्म-सशक्तीकरण) आणि ‘National Empowerment Mental Health’ (मानसिक आरोग्य कार्यक्रम) अंतर्गत विशेष मेडिटेशन (ध्यान) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणे आणि कार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये प्रामुख्याने नियमित ध्यान (Meditation) आणि सकारात्मक विचारसरणी (Positive Thinking) मुळे मानवी जीवनात कोणते सकारात्मक व अमूलाग्र बदल घडू शकतात, याबाबत सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली. मन शांत ठेवल्याने कामातील ताणतणाव कसा कमी होतो, याचे प्रात्यक्षिकही याप्रसंगी दाखवण्यात आले. “सकारात्मक विचार आणि दैनंदिन ध्यानधारणा हीच मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे. यामुळे व्यक्तीचे आत्मबळ वाढते.” अशी शिकवण या सत्रात देण्यात आली.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला वर्धा पोलिस विभागांतील १५ वरिष्ठ अधिकारी आणि १५० अंमलदार, मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदारांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि दैनंदिन जीवनात ध्यानाचा अवलंब करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात झाली.

       आशिष चिलांगे, सहायक जनसंपर्क अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये