ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनुष्यबळ निविदा घोटाळा: नगराध्यक्षांनी लक्ष घालावे – नगरसेविका शितल धोटे यांची मागणी 

"ऑफलाईन निविदा रद्द न करता ऑनलाईन काढली, कोर्टात गेल्यास विकास कामांवर स्थगिती येईल" - धोटे यांचा इशारा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

“मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारा” – नगराध्यक्षांना लेखी विनंती 

गडचांदूर :_ मनुष्यबळ पुरवठा निविदा प्रक्रियेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधत नगरसेविका शितल सुनील धोटे यांनी नगराध्यक्षांना लेखी पत्र देऊन तात्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

नगरसेविका धोटे यांनी पत्रात म्हटले आहे की, मुख्याधिकारी यांनी कर विभागामार्फत दि. १२/०३/२०२६ रोजी ऑफलाईन निविदा मागवल्या होत्या. त्या निविदेवर अंतिम निर्णय न होताच, दि. १५/०५/२०२६ रोजी पुन्हा ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या आहेत.

“सर्वात गंभीर बाब म्हणजे ऑफलाईन निविदा धारकांना नगर परिषदेकडून कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही. जर ते निविदा धारक न्यायालयात गेल्यास सदर निविदेवर स्थगिती येऊ शकते व त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम शहराच्या विकासावर पडू शकतो,” असा इशारा सौ. धोटे यांनी पत्रात दिला आहे.

“आपण शहराचे प्रथम नागरिक व नगरपरिषदेचे प्रमुख आहात. शहराच्या हिताचे सर्व निर्णय आपल्या मार्गदर्शनाखाली व्हावेत. करिता आपण स्वतः याकडे लक्ष देऊन मुख्याधिकारी यांना सदर निविदा प्रक्रियेबाबत विचारणा करून योग्य निर्णय घेण्यास अवगत करावे,” अशी आग्रहाची विनंती नगरसेविका शितल धोटे यांनी केली आहे.

याबाबत झालेल्या निर्णयाची माहिती कळवावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्राची प्रत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आली आहे.आता यावर नगराधक्ष काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये