ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक

नागरिकांमध्ये चिंता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये सायबर चोरट्यांनी फसवणुकीची नवी पद्धत अवलंबल्याच्या तक्रारी सामान्य नागरिकांकडून येत आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांच्या मोबाईलवर बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट संदेश व लिंक पाठवत असून, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईल हॅक होत असल्याची माहिती समोर येत आहे.

तक्रारीनुसार, संबंधित लिंकवर क्लिक केल्यास मोबाईलधारकाची बँकिंग माहिती, वैयक्तिक कागदपत्रे, संपर्क यादी (Contact List) तसेच इतर महत्त्वाची माहिती सायबर चोरट्यांच्या ताब्यात जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यानंतर हॅक झालेल्या मोबाईलमधील संपर्क यादीतील इतर नागरिकांनाही त्याच प्रकारचे संदेश व लिंक पाठवून फसवणुकीचे जाळे वाढविले जात असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांच्या बँक खात्यांमधील रक्कम तसेच वैयक्तिक माहिती धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.नागरिकांनी वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना या प्रकरणात विशेष लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच संबंधित Bank of India शाखांकडून आवश्यक माहिती घेऊन सायबर विभागामार्फत या गुन्ह्याचा सखोल तपास करून दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोणतीही अनोळखी लिंक, बँकेच्या नावाने आलेले संशयास्पद संदेश किंवा ओटीपीची मागणी करणारे कॉल यांना प्रतिसाद देऊ नये, तसेच अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये