ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे राबविण्यात आलेल्या कोबिंग ऑपरेशनने गुन्हेगारीत खळबळ

सराईत गुन्हेगार पोलीसांचे रडारवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील पोलीस निरीक्षक श्री संतोष ताले यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी राबविण्यात आलेल्या कोबींग ऑपरेशन दरम्यान शहर परीसरातील अवैध व्यवसाय धंदेवाईक, शरीराविरूद्ध चे गुन्हे करणारे गुन्हेगार, मालमत्तेचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांना नियीमत तपासुन पोलीस स्टेशनला बोलावुन त्यांचेविरुद्ध प्रतीबंधक कार्यवाही करून भविष्यात कोणतेही बेकायदेशीर कृत्य केल्यास कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी तंबी देण्यात आली. पोलीस प्रशासनाचे आक्रमक मोहीमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्ये मोठी खळबळ उडाली असुन समाजकंटकावर प्रभावी वचक निर्माण झाला आहे. नागरीकांचे सुरक्षिततेस बाधा आणणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. संघटीत गुन्हेगारी, दहशत निर्माण करणारे गुन्हेगार, मोकाट फिरणारे रेकॉर्डवरील आरोपी व कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांविरूद्ध अशाचप्रकारच्या मोहीमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीमध्ये संघटीत गुन्हे करणारे गुन्हेगार, शरीराविरूद्ध गुन्हे करणारे आठ आरोपी, मालमत्तेचे गुन्हे करणारे 10 आरोपी, तसेच इतर रेकॉर्डवरील आरोपी यांना शांतता व सुव्यवस्था राखण्याबाबत नोटीस देण्यात आला. तसेच अवैध व्यापार करणारे व शस्त्र बाळगणारे रेकॉर्डवरील 127 गुन्हेगारांच्या नियमीत घरझडत्या घेवुन अवैध शस्त्र जप्ती बाबत विषेश मोहीम राबविण्यात आली असुन अवैध्य शस्त्र बाळगणाऱ्यां विरूद्ध शस्त्र कायदयाअन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. पोलीसांचे या कार्यवाहीमुळे अवैध्य शस्त्र बाळगणारे आरोपी हे शहर परीसर सोडुन पसार झाले आहे. चालु वर्षामध्ये संघटीत गुन्हेगारी चे सदस्य असलेल्या एकुण आठ आरोपीतांविरूद्ध मकोका कायदयाअन्वये कार्यवाही करून आंरोपींना गजाआड करण्यात आले आहे. पोलीसांच्या या कार्यवाहीमुळे शहर परीसरात शांततेचे वातावरण निर्माण झाले असुन गुन्हेगारांचे मनात दहशत निर्माण झाली आहे.

पोलीस प्रशासन नागरिकांचे सुरक्षिततेबाबत कटीबद्ध असुन वाईट प्रवृत्तीच्या घटकांना न भिता कोणत्याही छोटया मोठ्या घटनेची तात्काळ पोलीसांना माहीती देण्याबाबत नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे, वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर वर्धा पोलीस निरिक्षक श्री संतोष ताले यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड व डि.बी. पथकातील अंमलदार यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये