ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध शस्त्र बाळगुन समामजात दहशत निर्माण करणा-या गुन्हेगारांची घेतली झाडाझडती

११ सराईत गुन्हागारांवर गुन्हे दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

जिल्ह्यात चाकु, तलवार, अग्नीशस्त्र व ईतर शस्त्र यासारख्या घातक शस्त्राचा वापर करुन गुन्हे करणारे, शस्त्र जवळ बाळगुन नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारावर प्रभावी कार्यवाही करण्याचे, गुन्ह्यांना प्रतिबंध करून जिल्ह्यातील गुन्हेगारीचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्देशाने सन २०२१ पासुन आजपावेतो स्वताजवळ अवैधरीत्या शस्त्र बाळगुन गुन्हे करणारे गुन्हेगारांचा अभिलेख तयार करून नमुद प्रमाणे गुन्हे करणारे गुन्हेगारांना तपासण्याची विशेष मोहीम, श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक जि. वर्धा व श्री सदाशिव वाघमारे, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे संपुर्ण जिल्हयात दि. २३/५/२०२६ ते २४/०५/२०२६ या कालावधीत राबविण्यात आली.याकरीता स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हयातील पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व अंमलदारांची पथके तयार करण्यात आली होती. सदर विशेष मोहिमेमध्ये स्थानिक गुन्हे शाखा, व जिल्हयातील संपुर्ण पोलीस स्टेशन मधील ४५ अधिकारी व २५० पोलीस अंमलदार सहभागी होते.

सदर मोहीमेदरम्यान योग्य नियोजन करून एकुण ८४२ गुन्हेगारांना तपासण्यात आले असता त्यापैकी ३८१ गुन्हेगार हे त्यांचे राहत्या वास्तव्याचे ठिकाणी हजर मिळुन आल्याने कायदेशीर प्रक्रीयेचे अवलंबन करून त्यांचे घरांची झडती घेण्यात आली. यादरम्यान खालील नमुद गुन्हेगारांकडे चाकुसारखे धारदार शस्त्र आढळुन आल्याने त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करून भारतीय शस्त्र अधिनियमान्वये संबंधीत पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद करण्यात आले.

गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे.

१) जुनेद पठाण, रा. इंदिरानगर आर्वी नाका, वर्धा

२) राहुल दशरथ जाधव, रा.वडार झोपडपट्टी, आर्वी नाका, वर्धा.

३) निखील गोमा गुजेवार, रा.पिपरी मेघे जि. वर्धा.

४) क्रिष्णा बाबुराव वाटघुडे, रा.सिंदी मेघे जि. वर्धा

५) गोकुळ सुनिल बावणे, रा. गुंजखेडा, पुलगाव जि. वर्धा

६) रोहीत नरेश नाईक, रा. सुभाषनगर पुलगाव जि. वर्धा

७) प्रसाद उर्फ यश निलेश, पराते रा. न्यु रेल्वे कॉलनी, वर्धा

८) अमित प्रभाकर कुमरे, रा.संत तुकाराम वार्ड, रामनगर, वर्धा

९) तुषार प्रभाकर बादलमवार, रा. रा. संत तुकाराम वार्ड, रामनगर, वर्धा

१०) अंकुश गजानन तिरपुडे राहणार हिंदनगर वर्धा..

११) सौरभ प्रकाश गांवडे राहणार भाईमारे ले आऊट वर्धा.

सदर या मोहिमेमुळे अवैधरित्या शस्त्र बाळगून गुन्हे करणाऱ्यां गुन्हेगारांवर वचक निर्माण झालेला त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यां गुन्हेगारांवर निश्चितच परिणाम होणार आहे त्याअनुषंगाने वर्धा जिल्हा पोलिस दलातर्फे श्री सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा श्री सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित अचानकपणे वरिल नमूद प्रकारच्या विशेष मोहीम राबवून गुन्हेगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्याचे सर्वोतोपरी वर्धा जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येणार आहे…

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये