ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरगुती विद्युत कनेक्शनमध्ये शॉर्ट सर्किट

आगीत घरातील मोठ्या प्रमाणात साहित्य जळून नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू तालुक्यातील सुरगाव येथील रहिवासी शब्बीर खा पठाण यांच्या राहत्या घरी घरगुती विद्युत कनेक्शनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत घरातील मोठ्या प्रमाणात साहित्य जळून नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच सेलू नगरपरिषदेचे नगर रचनाकार अग्रवाल यांनी तात्काळ दखल घेत सेलू येथून दोन अग्निशमन गाड्या व कर्मचारी पथक घटनास्थळी रवाना केले. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवत आग पूर्णपणे विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे परिसरातील परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आले नव्हते. घटनेची पुढील माहिती संबंधित यंत्रणांकडून घेतली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये