एमआयडीसी अन्यायग्रस्त बळीराजाला मिळणार आमदार विजय वडेट्टीवारांची साथ
गोंडपिपरीत २८ मे रोजी दुसरी शेतकरी परिषद ; शासनाच्या निर्णयाविरोधात निघणार महामोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
चंद्रपूरातील करंजी येथे एमआयडीसीच्या माध्यमातून दहा हजार कोटी रूपयाची गुंतवणूक असलेला प्रकल्प होऊ घातला आहे. याकरिता बारा गावातील दहा हजार एकर जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान शेतक-यांनी याला कडाडून विरोध केला आहे. अशात आता बळीराजांच्या मदतीला काॅग्रेसचे जेष्ठ नेते,माजी मंत्री, आमदार तथा करंजी गावचे भुमीपूत्र विजय वडेटटीवार सरसावले आहेत.
आज २८ मे रोजी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ते गोंडपिपरी येथे येत आहेत. स्थानिक कन्यका सभागृहात या लढयासंदर्भातील दुस-या शेतकरी परिषदेला मार्गदर्शन करण्यासोबत शेतकरी बांधवाच्या महामोर्चाचे ते नेतृत्व करणार आहेत. याप्रसंगी जेष्ठ शेतकरी नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सुभाष धोटे,अनु. जाती विभागाचे राज्याचे राज्याध्यक्ष, प्रसिध्द प्रबोधनकार अनिरूध्द वनकर, आदिवासी नेते गजानन जुनमाके, नागपूर हायकोर्टाचे ॲड.बोधी रामटेके, ॲड.दिपक चटप ह मार्गदर्शन करणार आहेत.
करंजी येथे चाळीस वर्षापुर्वी एमआयडीसी ला मंजुरी मिळाली. त्याकरिता पस्तीस एकर जागा हस्तांतरित करण्यात आली. शेतकरी बांधवाना तुटपूंजी मोबदला देण्यात आला. चाळीस वर्षाचा मोठा कालावधी लोटूनही येथे कुठलाच उदयोग आला नाही. आता याच एमआयडीसी च्या माध्यमातून दहा हजार कोटी रूपयाचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याकरिता बारा गावातील दहा हजार एकर शेती हस्तांतरित करण्याच्या प्रकियेला सुरवात झाली आहे. या प्रकल्पाला शेतक-यांचा मोठा विरोध आहे.आमच्या सुपिक जमीनी कारखान्याला दयायच्या अनं तिथेच नौकर म्हणून काम करायचे हे आम्ही कधीही सहन करणार नाही असे सांगत शेतकरी बांधवानी या प्रकल्पाला विरोध केला आहे. शेतकरी संघर्ष एकता समिती च्या माध्यमातून गेगेल्या महिनाभरापासून याविरोधात आंदोलनाची साखळी मोहिम सुरू आहे.
बोरगावात पहिली शेतकरी परिषद यशश्वीरित्या पार पडल्यानंतर आता दुसरी शेतकरी परिषद गोंडपिपरी येथील कन्यका मंदीरात संपन्न होउ घातली आहे. या परिषदेनंतर उपविभागीय कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व काॅग्रेसचे राज्यातील जेष्ठ नेते,आमदार विजय वडेटटीवार हे करणार आहेत. याप्रसंगी जेष्ठ शेतकरी नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सुभाष धोटे, अनु जाती विभागाचे राज्याचे राज्याध्यक्ष, प्रसिध्द प्रबोधनकार अनिरूध्द वनकर, आदिवासी नेते गजानन जुनमाके, नागपूर हायकोर्टाचे ॲड. बोधी रामटेके, ॲड. दिपक चटप हे मार्गदर्शन करणार आहेत.
“आमची शेती_ आम्हीच मालक” हा नारा देत शेतकरी एकता संघर्ष समितीच्या माध्यमातून तालुक्यातील बारा गावात जनजागृती करण्यात आली आहे. आंदोलनासोबतच कायदेशिर लढाई साठी समितीच्या माध्यमातून बळीराजा सज्ज झाला आहे. या आंदोलनाकरिता मोठया प्रमाणात शेतकरी बांधवानी उपस्थिती दर्शविवावी अनं आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून दयावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.



