ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मॅथमॅजिक अकॅडमीच्या ८० विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ जिल्यातील ‘मॅथमॅजिक अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. महाजेनको, महापारेषण, महावितरणसह विविध शासकीय विभागांमध्ये अकॅडमीच्या ८० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल १९ मे रोजी डॉ. शामप्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर येथे भव्य सत्कार सोहळा पार पडला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य इंजि. प्रा. निलेश बेलखेडे उपस्थित होते. अध्यक्षपद अकॅडमीचे संचालक इंजि. मंगेश गौरकार यांनी भूषवले. या प्रसंगी आ. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या “चंद्रपूरच्या तरुणांमध्ये अफाट सामर्थ्य आहे. तंत्रज्ञ-३ परीक्षा उत्तीर्ण होणे ही केवळ सुरुवात असून, आता तुमच्यावर समाजसेवेची मोठी जबाबदारी आहे.” प्रा. निलेश बेलखेडे यांनी हे यश विद्यार्थ्यांच्या जिद्द व संयमाचे फलित असल्याचे सांगत पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. तर, “नियोजनबद्ध तयारी आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळेच हा ऐतिहासिक निकाल लागला,” असे संचालक इंजि. मंगेश गौरकार यांनी स्पष्ट केले.

या सोहळ्यात निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते. अकॅडमीच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये