ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद

वर्धा शहर पोलिसांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. इतवारा बाजार परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपीला अटक केली आहे.

# घटनेचा तपशील आणि गुन्हा नोंद

इतवारा बाजार, वर्धा येथील रहिवासी फिर्यादी नागेश जानरावजी यांच्या तक्रारीवरून वर्धा शहर पोलीस ठाण्यात **अपराध क्रमांक ६२४/२०२६** अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना दिनांक १८/०५/२०२६ रोजी रात्री ११:५० वाजताच्या सुमारास घडली असून, अवधूत फुलझिले (वय ३५ वर्षे, रा. फ्रुट मंडी, इतवारा बाजार, वर्धा) असे या घटनेतील मृतकाचे नाव आहे.

आरोपीला काही तासांत अटक

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच या प्रकरणातील मुख्य आरोपी रवी गोविंद गंगावणे (वय ४२ वर्षे, रा. इतवारा बाजार, वर्धा) याला पोलिसांनी आज दिनांक १९/०५/२०२६ रोजी पहाटे ०५:०२ वाजताच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक केली आहे.

पोलीस तपास पथक

सदर कारवाई वर्धा शहर पोलीस स्टेशनचे सपोनि. प्रमोद रासकर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार इम्रान खिलची (बकल नंबर ९५५), पोलीस हवालदार खेमसिंग कोहचडे (बकल नंबर ६०३) आणि पोलीस शिपाई विजय खाडे (बकल नंबर ५६८) यांच्या पथकाने केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

सदर धडक कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद माकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष ताले व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये