ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. श्वेता सावलीकर सन्मानित

नवरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन अवॉर्ड 2026 प्रदान

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : नवरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे नवरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन पुरस्कार 2026 या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही संस्थांमार्फत भारतातील 13 राज्यांमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविल्या जातो.

तंबाखू मुक्त शाळा कार्यक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी नवरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई दरवर्षी शैक्षणिक संस्था तसेच गाव पातळीवर तंबाखूमुक्त आणि निरोगी वातावरण निर्मितीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करतात. यावर्षी भारतातील विविध राज्यातील सहा व्यक्तींना त्यांच्या कार्याबद्दल गौरवण्यात आले. यात महाराष्ट्रातून जिल्हा सामान्य रुग्णालय येथील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ.श्वेता सौरभ खांडरे (सावलीकर) यांना नवरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन अवॉर्ड 2026 ने गौरवण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये