वाघाच्या हल्ल्यात तेंदूपत्ता तोडणाऱ्या वनिता शंकर उईकेचा मृत्यू
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभिड :_ तालुक्यातील कीटाळी (मेंढा) येथील महिला वनिता शंकर उईके वय ५५ वर्ष ही तेंडुपाने तोडण्यासाठी जंगलात सकाळी नऊ वाजता गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. सदर घटना वन विभागाच्या महामंडळ क न ,६९ मध्ये घडली असून वन विकास महामंडळाचे वतीने तिचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल केल्यानंतर वन विभागाचे वतीने सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तेंदुपत्ता संकलन करताना वन विभागाच्या वतीने जंगलात जाताना समूहाने जावे असे आवाहन केले असतानाही आज सकाळी नऊ वाजता वनिता शंकर उईके हिचेवर हल्ला करून ठार केले आहे यामुळे पाने तोडणाऱ्यामध्ये भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. वृत्त लिहेपर्यंत पंचनामा आणि पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे समजते.



