ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेचा देशव्यापी बंदचा एल्गार

२० मे रोज बुधवारला मेडिकल स्टोअर राहणार बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने( AIOCD ) देशात व राज्यात सुरू असलेल्या इंटरनेट फार्मसी च्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री होत असल्याची बाब अवैध व गैर कायदेशीर असल्याचे नमूद करून ई – पोर्टल GSR 220 (E) दि.२८.८.२०१८ ,तसेच कोविड GSR 220 दि.२० मार्च २०२३ मागे घेण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

यापूर्वी प्रत्यक्ष भेटीतून शासन, प्रशासन, सबंधित मंत्री यांना औषध विक्रेत्यांनी होत असलेली गळचेपी निदर्शनात आणून दिली असतांना सुद्धा औषध विक्रेत्याना अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने दि.२० रोज बुधवारला आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन शासन व प्रशासनाच्या नकारात्मक धोरणाचा निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याअनुषंगाने भद्रावती तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी तालुका अध्यक्ष अविनाश पारोदे व सचिव बबलू राय यांचे नेतृत्वात तहसीलदार राजेश भांडारकर भद्रावती यांना निवेदन सादर करीत औषध विक्रेत्यांच्या तीव्र भावना व होणारा अन्याय शासनापर्यंत पोहचविण्याची मागणी केली आहे.

सदर बंद काळात आपत्कालीन अत्यावश्यक सेवेची गरज पडल्यास गरजूंना औषधी देण्याची लवचिक भूमिका तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी जाहीर केली असल्याने गंभीर रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये