ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. करन देवतळे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

भवानी मंदिर विंजासन सौंदर्यीकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील विंजासन येथील ब्रम्हगिरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीवर महिषासुर मर्दिनी चे निसर्गरम्य पुरातन मंदिर असून अनेक भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे.

या परिसराचे सौंदर्यीकरण करून या निसर्गरम्य श्रद्धा स्थानाचे जतन करण्यात यावे अशी मागणी भाविकांकडून सातत्याने करण्यात येत होती.

 भद्रावती वरोरा क्षेत्राचे आमदार करन देवतळे यांनी स्वतः पुढाकार घेत शहरातील प्राचीन वास्तूचे जतन होऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली.

आज दि.१८ रोजी भवानी माता परिसरात विधिवत पूजन करून सौंदर्यीकरणास प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी भाजप नेते माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, अमित गुंडावार, संजय वासेकर, प्रशांत डाखरे, अनंत गुंडावार, पाणीपुरवठा सभापती वृषाली पांढरे तथा भवानी माता मंदिर समिती सदस्य आदी सह असंख्य नागरिक व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी बोलताना शहराच्या विकासा सह या प्राचीन नगरीचे वैभव वाढविण्याकरिता लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध राहील असे प्रांजळ मत आ. करन देवतळे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल गोसवाडे यांनी तर आभार प्रदर्शन किशोर गोवारदीपे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये