ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या आयुर्वेदिक हॉस्पिटल भद्रावती येथे धन्वंतरी जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ सोमय्या आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिन धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली, सर्व पर्थम धन्वंतरी आयुर्वेदिक दैवत माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.प्रमुख पाहुणे श्री.पी.एस.आंबटकर,प्रा.राजदा सिद्दीकी,डॉ.किशोरभांडेकर,डॉ.सुमेधा खोब्रागडे,डॉ.शाईन सौदागर उपस्थित होते.

मान्यवर.श्री.पी.एस.आंबटकर यांनी आयुर्वेद विषयी माहिती देत,भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहेत. भारतात दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. धन्वंतरी सागरमंथन वेळी अमृत घेऊन आले होते अशी आख्यायिका आहे. धन्वंतरी ह्यांना विष्णूचा अवतार व आयुर्वेदाचे आराध्य दैवत मानले जाते.

ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः।

सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम॥

कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्यम।

वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम॥

           या प्रार्थनेमध्ये धन्वंतरीचे वर्णन आहे. मागील दोन हातांमध्ये शंख व चक्र आणि पुढील दोन हातांमध्ये जलौका (जळू) आणि अमृतकलश आहे. पीताबंर नेसून जगकल्याणासाठी, सर्वांना आजारांपासून मुक्त करण्यासाठी पृथ्वीतलावर अवतरले.धन्वंतरींनी आयुर्वेदाचे वर्गीकरण आठ विभागांत केले (म्हणून ‘अष्टांग आयुर्वेद’)त्यामुळे ते अध्ययनास सोपे झाले.

    आरोग्य आणि वैदयकीय सेवा क्षेत्रात परिचालिकाचे आणि डॉक्टरची मोठी भूमिका असते.

ह्या कार्यक्रमाला सोमय्या आयुर्वेदिक हॉस्पिटल चे डॉक्टर, परिचालिका आणि कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये